माजी खास संजय मंडलिक यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन
मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथील नावाजलेली पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी श्री.गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या नंदगाव (ता- करवीर) येथील पाचव्या शाखेचा उद्घाटन सोहळा माजी. खास. संजयदादा मंडलिक यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सोमनाथ यरनाळकर होते. यावेळी खा. संजयदादा मंडलिक म्हणाले, संस्था जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे कार्य करत असून संस्थेची घौडदौड अशीच कायम चालू राहण्यासाठी संचालक मंडळाने यापुढेही अविरत प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा दिल्या.
शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे यांनी संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले .यावेळी संस्थेचे खातेदार अशोक जाधव यांनी संस्थेच्या कर्ज सहाय्यामुळे झालेल्या प्रगतीचा अनुभव सांगितला. कार्यक्रमात ठेव पावत्या कृष्णात पाटील, सिमा पाटील, सुभाष शिंदे, तानाजी कानकेकर आणि पूजा किरण ताडे यांना देण्यात आल्या. तसेच नवीन खातेदार रणजित पाटील, ऋतुराज शिंदे, प्रशांत कदम, गोरखनाथ कुंभार, दशरथ गणपती शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते पासबुके देण्यात आली.

यावेळी संस्थापक चेअरमन उदयकुमार शहा यानी आपल्या प्रास्ताविकात स्व . खा .सदाशिवराव मंडलिक साहेबानी संस्था स्थापण करून दिली . त्यांच्या आशीर्वादाने संस्था प्रगतीपतावर आली आहे . सभासदानां आतापर्यत भेटवस्तूच्या रूपाने सलग तीन वर्षात १० लिटर खाद्यतेलाचे कॅन वाटप केल्याचे सांगितले.

याप्रसंगी चेअरमन सोमनाथ यरनाळकर, व्हा. चेअरमन राजाराम कुडवे, संचालक सर्वश्री एकनाथ पोतदार, आनंदा देवळे, मारुती पाटील, सुखदेव येरुडकर, प्रकाश हावळ, आनंदा जालिमसर, दत्तात्रय कांबळे, संचालिका स . रुपाली शहा, सौ . रेखा भोसले, कार्यलक्षी संचालक राहूल शिंदे , तसेच संस्थेचा कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेअरमन सोमनाथ यरनाळकर यांनी स्वागत केले, सूत्रसंचालन अविनाश चौगले यांनी केले, तर शेवटी संचालिका सौ. रेखा भोसले यांनी आभार मानले.