मुरगूड (शशी दरेकर) : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर, देवचंद कॉलेज अर्जूननगर व सेजाँग युनिव्हर्सिटी कोरिया यांच्या संशोधक विद्यार्थी प्रथमेश चौगले मुरगूड, अक्षता पट्टनशेट्टी, महेश बुरुड, विजय चव्हाण या संशोधकांना इंडक्शन – कम्बशन रासायनिक पद्धतीसाठी कोरियन सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे.
या संशोधनासाठी संशोधन प्रमुख प्रो. ड्यू की किम, डॉ. संदीप साबळे, डॉ. अविनाश रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी प्रथमेश चौगले, अक्षता पट्टनशेट्टी, महेश बुरुड , विजय चव्हाण यांनी ‘ फेराइट सुपर पॅरामॅग्नेटिक नॅनो पार्टिकल्स युजिंग शुगरकेन ज्यूस प्युएल फॉर इंडक्शन कम्बशन सिंथेसिस ‘ या विषयावर संशोधन केले .या संशोधनाची पद्धत कमीत कमी वेळेत व कमीत कमी खर्चात तुलनेने अधिक सोपी आहे . तसेच या फेराईट नॅनो पार्टिकलचा उपयोग हायड्रोजन प्रोडक्शनसाठी केला गेला आहे .

डॉ.संदीप साबळे, प्रो.ड्यु की किम (कोरिया) यांच्या स्टुडंन्ट एक्सचेंज प्रोग्रॅमसाठी प्रथमेश चौगले यांची एक महिन्यासाठी शेजोंग विद्यापीठ कोरिया येथे संशोधन करण्यासाठी निवड झाली होती ते संशोधन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले.
यासाठी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचे प्राचार्य सुरत मांजरे तसेच अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुभाष आडदांडे , देवचंद कॉलेज अर्जुन नगरचे फिजिक्स विभागाचे प्रमुख डॉ . एस डी पाटील, प्राचार्य जी. डी. इंगळे , तसेच जय शिवराय सोसायटीचे सेक्रेटरी माजी खास . संजय मंडलिक, ॲड वीरेंद्र मंडलिक यांचे प्रोत्साहन लाभले.