किल्ले बांधणी आधी गडभ्रमती महत्वाची – अरुण माने

स्पर्धैत नवमहाराष्ट्र मंडळाने पटकावला पहिला क्रमांक

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुलांनी किल्ले बांधणी करण्यापूर्वी गडभ्रमंती करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्या किल्ल्याची माहिती होते आणि आपण त्या किल्ल्याची निर्मिती परिपूर्णरित्या आपण करू शकतो असे प्रतिपादन महापारेषण चे अरुण माने यांनी व्यक्त केले. ते नवकला मंचच्या माध्यमातून आयोजित “छोटे मावळे “किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमांच्या प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.

Advertisements

  स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नवमहाराष्ट्र मित्र मंडळ, द्वितीय क्रमांक यश दबडे, आणि तृतीय क्रमांक रुद्र मेंडके गजानन महाराज तरुण मंडळ तर स्पर्धेतील उत्तेजनार्थ क्रमांक अमित खराडे, शिवशंभो कापशी रोड छत्रपती शिवाजी महाराज मंडळ खंडागळे गल्ली यांनी पटकावले तर विशेष पारितोषक श्री राम मित्र मंडळ पार्श्व महाजन जवाहर रोड यांना मिळाले या सर्वांना आकर्षक शिल्ड देऊन तर सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

Advertisements

या स्पर्धेमध्ये २५ जणांनी सहभाग नोंदवला होता .सर्व मुलांनी डोळ्याचे पारणे फेडणारे सिंहगड, पारगड, सिंधुदुर्ग, राजगड, मल्हारगड या किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती या स्पर्धेचे परीक्षण प्रा. रवींद्र शिंदे आणि महादेव सुतार यांनी केले. हुतात्मा स्मारक येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये बोलताना माने यांनी सांगितले की  मुलांनी मोबाईल मधून बाहेर पडून किल्ल्यांची निर्मिती केल्यास त्यांच्या ज्ञानामध्ये आणि छत्रपतींच्या गड किल्ल्यांच्या मध्ये आवड निर्माण होईल यासाठी नवकला सांस्कृतिक मंचच्या माध्यमातून घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

Advertisements

यावेळी स्वागत विनायक येरुडकर, प्रास्ताविक ओंकार पोतदार, पाहुण्यांची ओळख सिद्धांत पोतदार यांनी तर आभार दिग्विजय येरुडकर यांनी मानले यावेळी उद्योगपती विजय सापळे, सागर सापळे, शिवभक्त सर्जेराव भाट, सुभाष अनावकर, हेमंत पोतदार, सोमनाथ यरनाळकर, तानाजी भराडे, प्रदीप भोपळे, शिवाजी रावण त्यांच्यासह स्पर्धक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!