मळगे खुर्द येथे गोकुळ मार्फत दूध उत्पादक मार्गदर्शन कार्यक्रम
साके (सागर लोहार) :
गोकुळ दूध संघाने दैनंदिन २० लाख लिटरचे लक्ष ठेवले आहे. मुंबईच्या बाजारपेठेत गोकुळ उत्पादित म्हशीच्या दुधाला मोठी मागणी आहे. त्यामुळे कागल तालुक्यातून दूध संस्था व उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त म्हैस दूध उत्पादन घेवून दूध उत्पादकांनी घेऊन गोकुळच्या म्हैस दूध वाढीचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे प्रतिपादन गोकुळ चे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी केले.
मळगे खुर्द तालुका कागल येथे गोकुळ दूध संघामार्फत दूर उत्पादकांच्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते प्रमुख उपस्थितीत गोकुळचे संचालक अरुण डोंगळे ,योगेश गोडबोले होते.
यावेळी संचालक अरुण डोंगळे म्हणाले, म्हैस दूध उत्पन्न वाढीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी दूध उत्पादकांनी दुग्ध व्यवसायातील अडचणी व त्रुटी याबद्दल योग्य मार्गदर्शन घेऊन म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न करावेत शिवाय गोकुळ संघामार्फत म्हैस दूध उत्पन्न वाढवण्यासाठी गावोगावी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विनोद पाटील, विष्णू पाटील, बाबुराव गुरव यांच्या गोठ्यास भेटी दिल्या.
गोकुळ चे मॅनेजिंग डायरेक्टर योगेश गोडबोले यांनी दूध व्यवसायातील अडचणी, दुग्ध व्यवसाय वाढीसाठी करावयाचे उपाय यांचे मार्गदर्शन करून दुग्ध व्यवसायाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी एस. एम. पाटील होते.
कार्यक्रमास व्यवस्थापक सुभाष जामदार, शरद तुरंबेकर, दूध संकलन अधिकारी चंद्रशेखर घाळी, जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ बाळकृष्ण पोवार, सुपरवायझर रणजित शिंदे, महेश पाटील, सुभाष चौगले, आनंदा पाटील, सतिश साबळे, राजेंद्र पाटील, सुर्यकांत पाटील, पी.एस.पाटील, नामदेव पाटील, संतोष पालकर आदी दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. स्वागत भागवत पाटील यांनी केले तर आभार सुभाष चौगले यांनी मानले.