“कार्यकर्त्यांचा स्वाभिमान मंडलिक गटाची खरी ताकद : माजी खास संजय मंडलिक यांचे भावोद्गगार “
मंडलिक गटाशी एकनिष्ठ राहण्याची येरुडकर बंधूंची घोषणा.
मुरगूड ( शशी दरेकर ) : दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या घराण्याशी येरुडकर कुटुंबांचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. मंडलिक कुटुंबांच्या निष्ठा आमच्या काळजात असून माजी खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली यापुढेही येरूडकर घराणे एकनिष्ठपणे मंडलिकांच्या पाठीशी भक्कमपणे राहील ,असा ठाम विश्वास लक्ष्मण येरूडकर यांनी व्यक्त केला.
शहराच्या राणाप्रताप चौकातील येरुडकर कुटूंब ५० वर्षापासून निष्ठेने मंडलिक गटासोबत काम करत आहे. या कुटूंबातील माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष येरूडकर यांचे सर्व बंधूसह कुटुंबायांनी आज मुरगूड येथे मंडलिक यांच्या निवासस्थानी माजी खासदार संजय मंडलिक यांची भेट घेतली.

माजी नगराध्यक्ष गेले असले तरी संपूर्ण कुटुंब मंडलिक घराणे व गटाशी एकनिष्ठ असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मंडलिक घराण्यांने येरूडकर कुटूंबासाठी दिलेल्या योगदानाची माहिती यावेळी लक्ष्मण येरुडकर, भरत येरुडकर यांनी संजय मंडलिक यांच्यासमोर कथन केली.
मंडलिक कुटुंबाने मानाची अनेक पदे देऊनही बंधू सुखदेव येरूडकर यांनी शुल्लक स्वार्थासाठी मंडलिक गट सोडला असला तरी उर्वरीत सर्व येरूडकर कुटूंब मंडलिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा विश्वास येरूडकर बंधूंनी व्यक्त केला. लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक आणि कार्यकर्ते यांच्यातील नाते उलगडताना कार्यकर्त्यांचा मंडलिक घराण्याशी असलेला अकृत्रिम जिव्हाळा अनुभवताना माजी खासदार मंडलिकही यावेळी भावनावश झाले.
मंडलिक कुटूंबच नव्हे तर संपूर्ण मंडलिक गट तुमच्या पाठीशी आहे. तुमचा योग्य मानसन्मान राखला जाईल. तुमचा स्वाभिमानी बाणा हीच मंडलिक गटाची खरी ताकद आहे. ती अशीच जपून ठेवूया. अशा भावना माजी खासदार मंडलिक यांनी व्यक्त केल्या.
मंडलिक यांच्या निवासस्थानी यावेळी लक्ष्मण येरुडकर, भरत येरुडकर, कुमार येरुडकर, सचिन येरुडकर, अमोल येरुडकर, धनंजय येरुडकर, विशाल येरुडकर, विनायक येरुडकर, दिग्विजय येरुडकर यांच्यासह त्यांचे कुटूंबिय , माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके , माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले , माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले, माजी नगरसेवक सुहास खराडे , माजी नगरसेवक किरण गवाणकर , दिपक शिंदे , सर्जेराव पाटील , दत्तात्रय मंडलिक, बाजीराव खराडे , प्रा. एस. एन. आंगज , सुनिल मंडलिक व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.