कागल : गहिनीनाथ गैबीपीर उरूस 2025 निमित्त कागल शहरात मोठ्या प्रमाणावर भक्तांचा ओघ अपेक्षित आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कागल पोलिस ठाणे व कागल नगरपरिषद यांनी संयुक्तरित्या वाहतूक मार्ग व पार्किंग व्यवस्थेची आखणी केली आहे.
उरूस काळात शहरातील रस्ते व पार्किंग व्यवस्थेसाठी विशेष योजना करण्यात आली आहे. प्रमुख मार्गांवर वन-वे (एकेरी) वाहतुकीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे, तसेच विविध ठिकाणी पार्किंगची सुविधा दिली आहे. येणाऱ्या भाविकांनी आणि नागरिकांनी ठरवून दिलेल्या मार्गांचा वापर करावा, तसेच पार्किंग व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

कार्यक्रमाच्या मुख्य मार्गावर गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी महत्वपूर्ण चौक व रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क क्रमांकही प्रसिद्ध करण्यात आले आहेत: कागल पोलिस ठाणे – 02325-244033, विद्युत विभाग – 02325-244032 व इतर आपत्कालीन सेवांसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे फोन नंबर देखील उपलब्ध आहेत.
सर्व नागरिकांनी आणि भाविकांनी नियमांचे पालन करून उरूस कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.