मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व दुरवर नावलौकीक मिळवलेली श्री. लक्ष्मी -नारायण नागरी सहकारी पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ३ कोटी ४ लाख ४२ हजार इतक्या ठेवीचे संकलन केलेची माहिती चेअरमन किशोर पोतदार यांनी दिली.
यावेळी त्यानीं ठेवीदार, हितचिंतकानीं मोठया प्रमाणात ठेवीच्या दिलेल्या प्रतिसादाबद्दल अंतकरणापासून ऋण व्यक्त करत असेच इथून पुढेही संस्थेबद्दल प्रेम , जिव्हाळा, आपुलकी वृध्दिगत होत राहू देत अशी भावना व्यक्त करून ठेवीदार , हितचिंतक , पदाधिकारी , कर्मचारी यानीं दिलेलया सहकार्याबद्दल आभार मानून दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी व्हा . चेअरमन दत्तात्रय कांबळे, संचालक जवाहर शहा , पुंडलिक डाफळे , दत्तात्रय तांबट , अनंत फर्नांडिस , रविंद्र खराडे , चंद्रकांत माळवदे , विनय पोतदार , रविंद्र सणगर ,तज्ञ संचालक जगदिश देशपांडे , संचालिका सौ . सुनिता शिंदे , सौ . सुजाता सुतार , श्रीमती भारती कामत , कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी ,शाखाधिकारी सौ . सुनिता सूर्यवंशी ,यांच्यासह सर्व शाखेचे पदाधिकारी , कर्मचारी वर्ग उपस्थित होते.