मुरगूड ( शशी दरेकर ) : यमगे ता.कागल येथील सरपंचपदी संदीप केशवराव किल्लेदार -पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी सचिन हाके होते. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत हलगी कैचाळच्या ठेक्यावर नूतन सरपंचाची मिरवणूक काढली.
यमगे ग्रामपंचायतीवर मंत्री हसन मुश्रीफ संजय घाटगे गटाची सत्ता आहे. यामध्ये या आघाडीकडे सहा तर विरोधी मंडलिक राजे आघाडीकडे पाच सदस्य आहेत.सुरवातीच्या काळात संजय घाटगे गटाचा एकच सदस्य असताना ही मुश्रीफ गटाने दिलीप पाटील यांना सरपंच पदाची संधी दिली होती. त्यानंतर विजया कुंभार, प्रमिला पाटील, विशाल पाटील यांची निवड झाली कुंभार, पाटील यांनी आपला कार्यभार पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला.

सद्या रिक्त असणाऱ्या पदावर आज संदीप पाटील यांची निवड झाली. सदस्य मंडलिक गटाचे अभय भोसले आणि विशाल पाटील यांनी नाव सुचवले. माजी सरपंच दिलीप पाटील यांनी अनुमोदन दिले.
यावेळी तलाठी विजय गुरव, उपसरपंच ज्योती लोकरे, दिलीप पाटील, विजया कुंभार, यांच्यासह शामराव पाटील, शिवाजीराव पाटील, साताप्पा पाटील कीरण पाटील, राजू सावंत, दगडू किल्लेदार, मारुती पाटील, ओंकार पाटील, अनिल पाटील, इंद्रजीत पाटील, दीपक पाटील, काकासो पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.