कागल (प्रतिनिधी): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार, कागल येथील दिवाणी न्यायालयात (कनिष्ठ स्तर) १३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, विविध प्रकारची प्रलंबित आणि दावा दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.
यातून एकूण २ कोटी ८५ लाख ५९ हजार ८८९ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली.या लोक अदालतीमध्ये प्रीलिटिगेशन (दावा दाखलपूर्व) आणि न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे सामोपचाराने सोडवण्यासाठी ठेवण्यात आली होती.

बँक प्रकरणे (प्रीलिटिगेशन): ११०२ प्रकरणांपैकी ९ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आणि त्यातून ५ लाख २६ हजार रुपयांची वसुली झाली.

ग्रामपंचायत, MSEB, BSNL प्रकरणे (प्रीलिटिगेशन): १४०९ पैकी १२३ प्रकरणे निकाली काढून ३ लाख ६४ हजार ८६१ रुपयांची वसुली करण्यात आली.प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे: न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी १५ आणि फौजदारी १८० प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आली, ज्यातून तब्बल २ कोटी ७६ लाख ६९ हजार २८ रुपयांची वसुली झाली.

- 【Elimination Of Odor】: Car air freshener has concentration and extraction of natural flower and fruit tree raw materials…
- 【Solar-Powered Drive】- Using car fresheners solar energy to drive intelligent rotating purifier, solar car accessories a…
- 【Exquisite Appearance and Widely used】- Car accessories interior decoration, made of light luxury alloy, the shape is mi…
या लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) मा. श्री. ए.बी. मडके यांनी पॅनेल प्रमुख म्हणून काम पाहिले, तर ॲड. पी. व्ही. चव्हाण यांनी पॅनेल सदस्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश मा. श्रीमती पी. एस. पाटील, कागल वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. ए.पी. पाटील, सचिव श्री. ए.बी. सांगावकर, सरकारी वकील, इतर वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पक्षकार उपस्थित होते. या सर्वांच्या सहकार्यामुळे ही लोक अदालत यशस्वी झाली.