३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा
पेठ वडगाव (सुहास घोदे) : श्री शिवाजीराजे व्यापारी नागरी सह. पतसंस्था मर्या; पेठ वडगावची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी जिप्सी रेस्टॉरंट, भादोले रोड, पेठ वडगाव येथे खेळीमेळीचे वातावरणात पार पडली. दीप प्रज्वलन व श्री शिवप्रतिमेच्या पुजनाने सभेच्या कार्यक्रमास सुरूवात झाली. संस्था सभासदांनी संस्थेच्या कारभारावर दाखविलेला विश्वास व त्यानी केलेल्या सहकार्यामुळे संस्थेने सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे.
इथून पुढेही असेच सहकार्य करावे अशी इच्छा व्यक्त करून संस्था चेअरमन श्री अजय थोरात (माजी उपनगराध्यक्ष) यांनी सभासदांना १३% डिव्हीडंड जाहीर केला. अहवाल वाचन करताना गतवर्षी पेक्षा अहवाल सालात १ कोटी ९४ लाख ६० हजार इतक्या ठेवी वाढ झालेचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच संस्थेस २० लाख २७ हजार ३८७ रू. नफा झालेचे घोषित केले. संस्थेच्या ठेवी २३ कोटी ०४ लाख ३४ हजार १९० तर कर्जे १२ कोटी ९९ लाख ४३ हजार ६५५ , गुंतवणूक १० कोटी ६४ लाख १४ हजार ६३६ इतक्या असलेचे सांगितले.
पेठ वडगावचे प्रतिष्ठित डॉक्टर आरजे श्री अभयसिंह यादव यांनी सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत संस्थेने प्रगती केली आहे, तसेच अहवाल सालात संस्थेने कलेल्या कार्याबद्दल संचालक मंडळ कौतुकास पात्र आहे, उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी, असे प्रतिपादन केले.
या सभेवेळी सभासद सर्वश्री, शरद गुरव, मोहन पाटील, हेमंतकुमार पाटील, डॉ रवीद्र जंगम, शरद पाटील, शरद जाधव, सुनील माने, सचिन तुरंबेकर, बाजीराव धनगर व इतरांनी सक्रीय सहभाग घेतला. नोटीस व विषय वाचन मुख्य व्यवस्थापक श्री संतोष नांगरे यांनी केले. या सभेमध्ये कीडा व शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविलेल्या कु. सुमती लड्डे, अर्चित मकोटे, सना शिकलगार, प्रसाद पाटील, श्रेयश देवकर, राजस्व हिरवे, कु. श्वेता पोळ व अॅड उपासना भोपळे व पत्रकार राहूल शिंदे यांचा सत्कार करणेत आला.
- To prevent tampering and ensure the safe storage of the gold until the loan is repaid.ornaments.
- Soft HD matterial 120 micron void tape 2 TIME NUMBERING 2 time audit oping with parporeshan one side transparent 1 Side …
- Size 9″ x 13″
या सभेस व्हा.चेअरमन श्री संजय कदम, संचालक सर्वश्री बाळासोा पाटील, सुरेंद्र जंगम, सतीश ताटे, देवेंद्र राणे, अॅड. रमेश पाटील, अभिताब सणगर, पुष्पराज भोपळे हे सर्वजण तसेच संस्थेचे सभासद, तसेच पत्रकार सर्वश्री सुहास जाधव, राहूल शिंदे, संतोष सणगर, प्रकाश सावर्डेकर, सुहास घोदे इ. उपस्थित होते. यावेळी सभेपुढील सर्व विषय एकमुखाने मंजूर करणेत आले. सुत्र संचालन व आभार प्रदर्शन मुख्य व्यवस्थापक श्री संतोष नांगरे यांनी केले. सभेस उपस्थित सर्व सभास्दांची उत्तम अल्पोपहाराची सोय संस्थेने केली होती.
सभा यशस्वी करणेमध्ये सभासद सर्वश्री संगाम थोरात, अभिजीत शिंदे, हेमंत पाटील, डॉ रवींद्र जंगम, अभयसिंह थोरात, संदीप पाटील, सर्व कर्मचारी व अल्प प्रतिनिधी यांनी मोलाचा हातभार लावला