मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील नाका नंबर एक समोर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले होते तसेच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साठल्यामुळे मुरगुड शहरांमध्ये प्रवेश करण्यासाठी या खड्ड्यामधूनच प्रवास करावा लागत होता.
आज त्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदार आल्याचे समजतात नागरिकांनी हे काम बंद पाडून या ठिकाणी पूर्ण 40 फुटाचा रस्ता करण्याची मागणी केली यानंतर ठेकेदार आणि सुपरवायझर यांनी संबंधितांशी चर्चा केल्यानंतर कंपनीच्या वतीने या ठिकाणी पूर्ण 40 फुटाचा रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले. त्याची पूर्णता करताना पूर्ण रस्ता खोदून घेऊन हा चाळीस फूट रस्ता दोन दिवसांमध्ये तयार करून देण्याचे आश्वासन त्यानी उपस्थितना दिले.

यावेळी नागरिकांची मोठी संख्या जमली होती .मुरगूड देवगड मार्गावरती ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत मात्र त्याकडे संबंधित कंपनी आणि ठेकेदारांची दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवासी आणि नागरिक संतप्त झाले होते . यातच मुरगुड येथील नाक्यावर खड्डे भरण्याची काम सुरू असल्याचे माहिती मिळतच नागरिकांनी या ठिकाणी गर्दी करून हे काम बंद पाडले आता या ठिकाणी पूर्ण चाळीस फुटाचा रस्ता होणार असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले .
यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर, दलित मित्र एकनाथ देशमुख, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, अमोल देवळे, गोविंद मोरबाळे मिस्त्री, प्रकाश देवडकर, पांडुरंग चौगले, भरत देवळे, नामदेव माने, सुनील लोकरे, योगेश चौगले, नितीन माने, महादेव घोडके, अजित चौगले, संदीप परीट, सुहास देवळे बाजीराव देवळे, विजय देवळे, अभिजीत देवळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.