खास नवरात्र निमित्त कागल आगार राबवणार नवदुर्गा दर्शन व्यवस्था

कागल : नवरात्र उत्सवानिमित्त कागल आगारामार्फत दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नागरिकांसाठी नवदुर्गा दर्शनची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवेमुळे भक्तांना कागल आणि परिसरातील प्रमुख देवी मंदिरांना सहज आणि सुरक्षितपणे भेट देता येणार आहे.

Advertisements

कागल आगाराने लक्ष्मी मंदिर कागल, उजळाई देवी, यमाई, अम्बाबाई कोल्हापूर, तुळजाभवानी कोल्हापूर, कातायनी, वाघजाई, तुळजाभवानी हुबळी, त्यांबोळी, आणि महालक्ष्मी कोल्हापूर या ठिकाणी दर्शन यात्रेची सोय केली आहे. या यात्रेसाठी महिलांसाठी २६७ रुपये व पुरुषांसाठी ५३४ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

Advertisements

तपशीलवार माहिती आणि नोंदणीसाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा:

Advertisements
  • श्री. संदीप पाटील : ९६५७११२५५४
  • श्री. अरण लाड : ९१५६९०९५९०
  • श्री. मारुती जोशी : ७७१९८९९३४१
  • सौ. मीरा गिरी : ८३८०८१०८०९

सदर दर हे आगाराच्या नियमानुसार निश्‍चित करण्यात आले आहेत. नागरिकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कागल आगाराने केले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!