मुंबई : राज्यातील दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व इतर गरजू घटकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यात तब्बल १ हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. यामुळे सध्या १५०० रुपये मिळणाऱ्या लाभार्थ्यांना आता दरमहा २५०० रुपये मिळणार आहेत. हा नवीन दर ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय सहमतीने घेण्यात आला. वाढत्या महागाईचा बोजा आणि दिव्यांगांसमोरील दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन ही मदत वाढविणे आवश्यक असल्याचे बैठकीत मत व्यक्त करण्यात आले.

लाभार्थ्यांची सद्यस्थिती :
- संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत सध्या ४ लाख ५० हजार ७०० लाभार्थी आहेत.
- श्रावणबाळ योजना अंतर्गत २४ हजार ३ दिव्यांग लाभार्थी आहेत.
या सर्वांना आता वाढीव दराने मदत दिली जाणार आहे.
- 4-in-1 USB Hub, 1 3.0 USB-A port, and 3 2.0 USB-A ports make it easier to connect different devices at the same time.
- With 4 USB-A ports, Mport 31 makes multitasking easy and gives you added comfort while working.
- USB 3.0 port gives you high-speed connectivity with up to 5Gbps data transfer speed.
अर्थसंकल्पीय तरतूद :
या योजनेसाठी राज्य सरकारकडून सुमारे ५७० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली असून, निधीची तरतूद वित्त विभागाने केली आहे.
लाभार्थ्यांसाठी दिलासा :
महागाई, वैद्यकीय खर्च, औषधोपचार व इतर दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सरकारने केलेली ही वाढ दिव्यांग व निराधार घटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संबंधित लाभार्थ्यांचे अर्ज व नोंदणी कामकाज नियमितपणे सुरू राहील.
राज्य सरकारचा हा निर्णय समाजातील दुर्बल, दिव्यांग व वृद्ध घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.