कोल्हापूर – शारीरिक श्रम व सेवेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या बलुतेदार, अलुतेदार, विविध सेवाकरी समाजांना भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या आरक्षणात प्रबळ मराठा समाजाचा समावेश केला जाऊ नये, या मागणीसाठी तसेच ओबीसींच्या विविध हक्कांसाठी बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर समोर ओबीसी जनमोर्चाच्या वतीने भव्य निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ओबीसी, भटके-विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील माता, भगीणी, बांधव व युवांना आपले घटनात्मक अधिकार वाचविण्यासाठी या निदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जनमोर्चाचे राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार, जिल्हाध्यक्ष शिवाजी माळकर, ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार, सयाजी झुंजार, मिनाक्षी डोंगरसाने, विजय घारे, मोहन हजारे, सुनील गाताडे, अनिल खडके, चंद्रकांत कोवळे, किशोर लिमकर, पंडीत परीट, बाळासाहेब लोहार, दत्तात्रय सातार्डेकर, सुनील महाडेश्वर, सुनील सावर्डेकर, राजाराम सुतार, संजय काटकर आदींनी केले आहे.

या निदर्शनाचे मुख्य मुद्दे म्हणजे ओबीसींना संविधानाने दिलेले आरक्षण सुरक्षित ठेवणे, ओबीसी समाजाच्या विविध मागण्या शासन दरबारी मांडणे व त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यास शासनाचे लक्ष वेधणे होय। जिल्ह्यातील सर्व ओबीसी घटकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.