कागल (सलीम शेख) : कागल येथे श्रीमंत राजे वीरेंद्रसिंहजी घाटगे यांच्या शुभहस्ते जल अमृत जयसिंगराव तलावाचे पाणी पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. हा सोहळा अत्यंत भव्य आणि दिव्य वातावरणात संपन्न झाला.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून, श्रीमंत राजे समरजीतसिंहजी घाटगे यांचे विश्वासू व कर्तव्यदक्ष सहकारी सूर्यकांत उर्फ प्रमोद सुबराव कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांची दूधगंगा डेअरी दूधगंगा उद्योग समूहाच्या नूतन चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल हा सत्कारसोहळा आयोजित करण्यात आला होता. श्रीमंत राजे वीरेंद्रसिंहजी घाटगे यांच्या हस्ते गुच्छ देऊन प्रमोद कदम यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी राजे बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमोद कदम यांच्या निवडीमुळे दूधगंगा उद्योग समूहाला नवी दिशा मिळेल, अशी आशा या वेळी व्यक्त करण्यात आली.