मुरगूड नगरपरिषदेतर्फै ” हर घर तिरंगा ” मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : केंद्र सरकारच्या ” स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमिवर २ ऑगस्ट ते १५ ऑगष्ट २०२५या कालावधीत “हर घर तिरंगा” ही जनजागृती मोहीम संपूर्ण देशभर राबवली जात आहे.

Advertisements

या मोहिमेच्या पार्श्वभूमिवर एक भाग म्हणून दिनांक १३ ऑगस्ट२०२५ रोजी मुरगूड नगरपरिषद यांच्या वतीने मुरगूड शहारामध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीला अधिकारी , कर्मचारी यांच्यासह मुरगूडच्या नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

Advertisements

बाईक रॅलीची सुरुवात नगर परिषदेच्या कार्यालयापासून नाका नं. १, बाजारपेठ, पोलिस स्टेशन रोड, तुकाराम चौक, गावभागातून पुन्हा नगरपरिषद कार्यलय येथे काढण्यात आली.

Advertisements

या दरम्यान हातात तिरंगा घेऊन “हर घर तिरंगा”, भारत माता की जय’, “वंदे मातरम” अशा घोषणानीं मुरगूड शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

बाईक रॅलीच्या समारोपानंतर नगरपरिषद कार्यालयात तिरंगा कॅनव्हास , सेल्फी पॉईंट , व नागरीकासाठी “घरोघरी तिरंगा – जय हिंद” असे संदेश देणारे फलक लावण्यात आले . हा उपक्रम नागरीकांमध्ये देशप्रेमाची भावनां बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आली.

ही मोहिम मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अतीश वाळूंज यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मुरगूडवाशीय मोठया संख्येने सहभागी झाले होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!