कागल (प्रतिनिधी) : डॉल्बीचा दणदणात नको, हुल्लडबाजी नको, महिलांची छेडछाड नको, मद्यप्राशन नको, पिचकारी नको असे सांगत तरुण मंडळांनी सामाजिक व विधायक कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन कोल्हापूरचे करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनी कागल येथे बोलताना केले.
होऊ घातलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते कागल येथे बोलत होते .कागल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या 28 गावातील तरुण मंडळी पोलीस पाटील व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक कागल येथील बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित करण्यात आली होती.

विभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर म्हणाले नजीकच्या काळात विविध निवडणुका होत आहेत .त्या अनुषंगाने तरुण मंडळांना भरी स्वरूपात देणगी मिळेल. या मिळालेल्या देणगीचा वापर तरुण मंडळांनी सामाजिक व विधायक कार्यासाठी वापरावा. गावात सीसीटीव्ही बसावेत, गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी. गावात सामाजिक व उपक्रम राबवावेत. आपल्याच गावात वयोवृद्ध रुग्ण व्यक्ती राहत असतात. त्यांच्या आरोग्याला जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याला बादा येईल असे कोणतेही कृत्य करू नये.
डॉल्बी चा आवाज ठरवून दिलेल्या मर्यादित असावा. विसर्जनाची मिरवणूक ठरवून दिलेल्या दिवशीच वेळेत व्हावी यासाठी मंडळांनी सहकार्य करावे. याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिवशी मुर्ती विसर्जनास करण्यास परवानगी दिली जाणार नाही. मिरवणुकीत हिडीस अथवा अश्लील नृत्ये असू नयेत. मिरवणूक साठी वापरली जाणारी वाहने व चालक सक्षम असावेत. ग्रामपंचायत-नगरपालिका यांनी केलेल्या आवाहना नुसार मूर्ती दान करावी.
ते म्हणाले यावर्षी वेगवेगळ्या प्रकारची पथके तयार केली आहेत. या पथकांची सर्व मंडळांवर निगराणी राहील. मद्य प्राशन करणाऱ्यांच्या वर कठोर कारवाई होणारच. गणेश उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता मंडळांवर कायदेशीर कारवाई होऊ नये यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे. उत्साही व आनंदी वातावरणात सन 2025 चा गणेशोत्सव साजरा करूया .असे आवाहन पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनी केले.
कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार म्हणाले सर्वसामान्य जनतेला त्रास होईल असे कोणतेही कृत्य केल्यास कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होणार. लेसर वापर करणाऱ्यांच्यावर त्याच ठिकाणी कारवाई होणार, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद कराळेकर, वीज अभियंता अभय
आळवेकर, डॉक्टर प्रवीण चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले. कागल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव जमादार यांनी आभार मानले.
या बैठकीस कागल पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या 28 गावातील पोलीस पाटील तरुण मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.