कागल (प्रतिनिधी) : रांची येथे होणाऱ्या फ्रीस्टाईल महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी रिया रामचंद्र ठेंगे हिची निवड झाली आहे.ती कागल येथील डी आर माने महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बीए च्या तृतीय वर्षातील वर्गात ती शिकते आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित 23 वर्षीखालील महाराष्ट्र राज्य संघ निवडचाचणी कुस्ती (महिला) रिया हिने फ्रीस्टाइल कुस्ती 50 kg वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे या स्पर्धा दि. 09 व 10 ऑगस्ट रोजी लोणीकंद (पुणे) येथे पार पडल्या.
रियाची 22 ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत रांची (झारखंड) येथे होणाऱ्या फ्रीस्टाईल महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली.

तिच्या या यशात संस्थेचे सचिव प्रताप (भैय्या) माने, कॅम्पस डायरेक्टर डॉ. प्रवीण चौगले, प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम यांचे प्रोत्साहन तर शारीरिक शिक्षण संचालक डॉ. श्रीनिवास पाटील व प्रा. संग्राम तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले.