मुरगूड ( शशी दरेकर ) – व्याकरण भाषेला सुस्पष्ट आणि अर्थपूर्ण बनविते. असे प्रतिपादन सदशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ‘इंग्रजी विभागामार्फत नवे शैक्षणिक धोरण २०२०’ या अभ्यासक्रमावर आधारित भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
प्राचार्य होडगे आपल्या मनोगतामध्ये पुढे म्हणाले की, व्याकरण हा भाषेचा आत्मा असतो. ते आपल्याला भाषेचा योग्य वापर करायला शिकवते. तसेच आपली भाषा अधिक प्रभावी, स्पष्ट आणि सुंदर बनविते. होडगे यांनी आपल्या मनोगतामध्ये तर्खडकरांपासूनच्या व्याकरणांनी दिलेल्या योगदानाचा परामर्शही घेतला. तसेच भित्तीपत्रके तयार केलेल्या विद्यार्थ्यांचे व इंग्रजी विभागाच्या प्रा. प्रधान यांचे कौतुक केले.

या प्रसंगी बी. ए. भाग १ च्या कु. भार्गवी रणजीत कदम हिने उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी प्रास्ताविक सादर करताना भित्तीपत्रकाचे अभ्यासपूरक उपक्रम म्हणून विद्याथ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्व विशद केले. तर बी. ए. भाग १ च्या कु. पूजा अरविंद राऊत हिने सर्वांचे आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी बी. ए. भाग १ च्या कु. भार्गवी रणजीत कदम, कु. पूजा अरविंद राऊत, कु. श्रध्दा संदीप सुतार, कु. क्षितिजा टिकले आणि बी. कॉम. भाग १ च्या कु. वैष्णवी गणेश शिंदे या विद्यार्थिनींनी भित्तीपत्रके तयार केली.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. पोवार, आर्टस् फॅकल्टी हेड प्रा. डॉ. सौ. पाटील, हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. सोहनी, डॉ. अशोक पाटील, भूगोल विभागप्रमुख प्रा. डी. ए. सरदेसाई, प्रा. नितेश रायकर, प्रा. सुहास गोरुले, प्रा. सौ. अर्चना कांबळे, बी.ए. व बी. कॉम. चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.