मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील शिवाजी विद्यामंदिर शाळा नं २ ला शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल बनवणाऱ्या अध्यापक मकरंद मल्लू कोळी यांची झालेली बदली रद्द करावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, पालक व शाळा व्यवस्थापन कमिटी सरसावली आहे. बदली रद्द करावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, नामदार हसनसो मुश्रीफ , माजी खास. संजय मंडलिक यांना भेटून मागणी केली आहे.
‘बदली रद्द करा’ मागणीसाठी जिल्हा प्रशासनाकडे धाव

या शाळेतील मकरंद कोळी यांची संगणकीकरण बदली झाली आहे. कोळी व सर्व स्टाफ या शाळेत २०१८ ला बदलीने हजर झाले आहेत . त्यावेळी शाळेचा पट १०० च्या आस पास होता शाळा मुख्याध्यापक पद अपात्र झाले होते परंतु या शाळेतील सर्व अध्यापकांनी वेळेचे बंधन न ठेवता काम केल्याने शाळेचा पट १८२ पर्यंत वाढला आहे. मोडकळीस आसलेली शाळा सध्या खूपच प्रगती पथावर आहे. शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अध्यापक मकरंद कोळी यांनी झपाटून काम केले आहे.

सन २०२२/२३ मध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या इयत्ता ४ थी च्या वर्गाची प्रज्ञाशोध परिक्षेत तालुक्यात पहिल्या ५० मध्ये १६ मुले होती . सध्या त्यांच्याकडे इयत्ता २ री चा वर्ग आहे . वर्गाचा पट ६० आहे. हा वर्ग सन २०२४/२७ मध्ये प्रगत वर्ग स्पर्धेत जिल्हयात पहिला आला आहे. जिल्हा परिषद अंकुर परिक्षेत जिल्हयात पहिला क्रमांक याच विद्यार्थ्यांचा आहे. त्यांच्याकडे B.L.O. चार्ज आहे. इतर कामे असून सुदधा त्यांनी उल्लेखनीय शैक्षणिक काम केले आहे.
तसेच शाळेत दरवर्षी इंग्रजी मिडियम, सेमी इंग्रजी मेडियम आणि इतर खाजगी शाळेतून १५ ते २० विदयार्थी प्रवेश घेतात. एकूणच शाळेचे काम उत्कृष्ठ सुरू आहे. म्हणून ही शाळा वाचवण्यासाठी मकरंद कोळी यांची बदली रद्द व्हावी. अशी निवेदनाद्वारे मागणी जिल्हा परिषद , प्राथमिक शिक्षणाधिकारी , गट शिक्षणाधिकारी, पालकमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे.
निवेदन देताना राजू आमते,अदिती कदम , प्रेरणा टेपुगडे ,तृप्ती कुंभार प्रियांका मिरजकर, अरुण मेंडके, संदीप रणवरे,शारदा कुंभार , पूजा रावण, बेबीताई दाभोळे गणेश वंडकर, शुभांगी शिंदे, प्रवीण लोहार, माया मेटकर तसेच शाळा कमिटी अध्यक्ष विजय मेंडके , अमर चौगले, अश्विनी गुरव,रेणू सातवेकर, मेघा डेळेकर , युवराज गुजर, महेश खंडागळे अमोल रणवरे, धीरज सातवेकर, सुनिता उपलाने, सुप्रिया भोसले,शंकर गुरव,अमर उपलाने, आनंदा मेंडके, किरण नेसरीकर, दिगंबर कळांद्रे, मानसिंग गोधडे आदि उपस्थित होते.