मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील मुरगूड स्टेशनतर्फे आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत उद्या शनिवार दि. २/८/२०२५ रोजी सकाळी ठिक १० वाजता श्रीराम मंगल कार्यालय भूते हॉल ( चिमगांव रोड ) येथे बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीला मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर ( उपविभागीय पोलीस आधिकारी करवीर विभाग कोल्हापूर ) यांची उपस्थिती असून गणेशोत्सव नियोजनबध्द, सुव्यवस्थित शांततेत पार पाडण्यासाठी मुरगूड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, पोलिस पाटील, शांतता कमिटी, गणेश तरुण मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष , कार्यकर्ते व डिजिटल, प्रिटिंग प्रेस, डॉल्बीचालक – मालक, पत्रकार बंधूनी नियोजित बैठकीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन मुरगूड पोलीस स्टेशनचे सपोनि शिवाजी करे व सर्व पोलीस स्टाफ यानीं केले आहे.
