जीवन समृध्दीसाठी वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज – प्राचार्य. डॉ. टी. एम. पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) : जीवन समृध्दीसाठी वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज असल्याचे मत प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. ते गगनबावडा येथील पदमश्री. डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय व आनंदी ज्युनिअर कॉलेज यांच्या ” भारतीय संस्कृतीतील समाजजीवनात  वन्यजीवांचे महत्त्व ” या विषयावर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आधुनिक युगात वन्यजीव, प्राणी, वनस्पती याबाबत सजगता दिसून येत नाही. त्यामुळे अन्नसाखळीत व्यत्यय येताना दिसतो. समृध्द जीवनासाठी ‘जगा आणि जगू दया’ याप्रमाणे वागले पाहिजे.

Advertisements

स्वागत व प्रास्ताविक – प्रा. अरुण गावकर यांनी केले. भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्त्व आणि वन्य सहजीवन याबाबत प्रा. सौ.देवयानी पारगांवकर यांनी माहिती विशद केली. प्रा. अक्षय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद‌यालयीन युवतींनी वन्यजीव संवर्धनाब‌द्दलची लोकगीते “चल गं सये वारुळाला, आला नागपंचमीचा सण अशी लोकगीते फेर धरून गायली.

Advertisements

सदर कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष प्रा . सतीश देसाई सचिव डॉ .विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले. यावेळी डॉ. संदिप पानारी, प्रा. आदिनाथ कांबळे, प्रा. हुसेन फरास, प्रा. रोहित सरनोबत, प्रा. अरूण गावकर, प्रा. अमर कुंभार, प्रा. सुप्रिया घाटगे, प्रा . शितल मोहिते,रविना कांबळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . सुप्रिया घाटगे यानी केले तर आभार प्रा . शितल मोहिते यानीं मानले .

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!