मुरगूड ( शशी दरेकर ) : स्वच्छ सर्वेक्षण २०२५ कचरा मुक्त शहर मानांकन व हागणदारी मुक्त शहरामध्ये मुरगूड नगरपरिषदेने उच्चतम कामगिरी करुन देशात २०३५ शहरांपैकी २६ वा व २० हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटा मध्ये राज्यात १६३ शहरांपैकी ४ था क्रमांक पटकावुन आपल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये योगदान अभादित केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ २५ मार्च ते २९ मार्च यावेळी फिल्ड असेसमेंट होऊन मुरगूड शहराला १२५०० पैकी १०००१ गुण प्राप्त झाले आहेत. यापुर्वीही नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण अभियामध्ये उच्चतम कामगिरी केली आहे. यापुढेही स्वच्छ सर्वेक्षण अभियान, कचरा मुक्त शहर अभियान, हागणदारी मुक्त शहर अभियान व माझी वसुंधरा अभियान यामध्ये अतिउत्कृष्ट कामगीरी करुन मुरगूड शहराचा देशात अव्वल क्रमांक पटकवण्याचा ध्यास केला आहे. असे मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अतिश वाळुंज यांनी सांगितले

या अभियानात उच्चतम कामगिरी करण्यासाठी मुरगूड शहरातील सर्व नागरिक, पदाधिकारी, तरुण मंडळे, सफाई कर्मचारी यांच्यासह स्वच्छता निरीक्षक श्री. सचिन भोसले, शहर समन्वयक विपुल अपराध, स्वच्छता मुकादम फ्रान्सीस बादरेस्कर, भिकाजी कांबळे यांनी योगदान दिले.