विठ्ठला भवती संत सारे झाले गोळा  फुलला आषाढीच्या भक्तीचा मळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीचा उत्सव. सारा महाराष्ट्र त्यात डुंबून गेला आहे.प्रत्येक भक्त म्हणजे माऊली विठ्ठलाचे चरण समजून एकमेकांचे चरण स्पर्श करण्याची ही महान परंपरा फक्त या पवित्र उत्सवात पाहायला मिळते.

Advertisements

 हे संस्कार विद्यार्थ्यांत सुद्धा भिनले पाहिजेत म्हणून हा उत्सव भक्तीभावाने त्याच उत्साहाने  शाळांमधून साजरा केला जातो.त्यामध्ये शिक्षक व पालक ही सहभागी होत असतात.

Advertisements

     विश्वधर्म सूर्ये पाहो हा वैश्विक शांतीचा ज्ञानदेवांचा संदेश सुद्धा त्यातून मुलांना मिळत असतो. उद्या रविवारची सुट्टी असल्याने मुरगूड येथील अनेक शाळांनी आषाढी चा हा भक्ती सोहळा आजच साजरा केला.

Advertisements

   विठ्ठल रखुमाईच्या भोवती गोळा झालेला अनेक संतांचा मेळा पाहून प्रेक्षक भारावून गेले.न बोलता आपोआप त्यांचे हात त्या सजीव प्रतिमां समोर जोडले गेले. पाऊले चालती पंढरीची वाट या भक्ती पंक्ती स्पीकरवर ऐकू येत होत्या.

   एम जे लकी इंटर नॅशनल स्कूल (न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल),मंडलिक संस्कार भवन इत्यादी शाळांनी टाळ मृदुंगाच्या तालावर दिंड्या काढल्या. आपल्या मुलांचे भाव विभोर दर्शन घेत पालक सुद्धा त्यात रंगून गेले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!