व्हनाळी: वार्ताहर बेलवळे बुद्रुक (ता. कागल) येथील दुधगंगा नदीकाठ ते काळाबागदेव मंदिरा पर्यंत सुमारे ५५ एकर क्षेत्रातील शेतक-याच्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले. नदीकाठी असलेल्या दत्त मंदिराजवळ असलेल्या डीपी च्या शेजारी असलेल्या विद्युत पोल वरती तारांच्याशॉर्टसर्किट मुळे उसाच्या फडाला दुपारी साडेबाराचे दरम्यान आग लागली आणि हा हा म्हणता उन्हा मुळे सुमारे ५० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. बिर्दीच्या अग्निशामकपाण्याच्या बंबानाही आग विझवण्यास मर्यादा आल्या. पाण्याच्या बंबानी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण रस्त्यावर गाडी उभारून ऊसाला लागलेल्याआगी पर्यंत शेतातून जाता येत नसल्यामुळे ऊस जळून खाक झाला.
आपदग्रस्त शेतकऱ्यांची नावे, कृष्णा ज्ञानू काशिद, आनंदा सावेकर, आनंदा कदम, प्रकाश नंदगावे, बाळू कदम, राजेंद्र हिंदूराव पाटील, बाबुराव पाटील, आदी सुमारे चाळीस भर शेतकऱ्यांचा ऊस जळाला. सदर नुकसान विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे झाल्याने नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई मिळावी व शाहू हमीदवाडा, बिद्री, संताजी घोरपडे, अन्नपुर्णा शुगरचे जळलेल्या ऊसाची लवकर उचल करावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.