कागल म्हाडा गृहप्रकल्पाचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लागणार: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कागल शहरातील म्हाडा गृहप्रकल्पाबाबतही सविस्तर चर्चा झाली. यावेळी म्हाडा प्रशासनाचे अधिकारी आणि संबंधित सदनिकाधारक उपस्थित होते.

Advertisements

या बैठकीत सदनिकाधारकांनी आपल्या समस्या मांडल्यानंतर, मंत्री मुश्रीफ यांनी तात्काळ मुंबई येथील म्हाडाच्या वरिष्ठांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि यावर तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश दिले.

Advertisements

मंत्री मुश्रीफ यांनी सदनिकाधारकांना ग्वाही दिली की, यासंदर्भात राज्यस्तरावर लवकरच एक बैठक आयोजित केली जाईल आणि येत्या आठ दिवसांत हा प्रश्न मार्गी लावला जाईल. त्यामुळे कागल म्हाडा गृहप्रकल्पातील सदनिकाधारकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!