मुरगूड येथे शिवभक्त यांच्यातर्फे वृक्षारोपण

परिसरात ५०० झाले लावण्याचा संकल्प

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील शिवभक्त यांच्यातर्फे सलग दुसऱ्या वर्षीही वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला यावेळी मुरगूड येथील पोलिस स्टेशन येथे मुरगूड चे एपीआय शिवाजी करे, मुरगुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवगड अध्यात्मिक संस्था, सरपिराजीराव तलाव परिसर या ठिकाणी २५ झाडे लावून या मोहीमेला सुरवात करण्यात आली.

Advertisements

शिवभक्तांतर्फे दुसऱ्या वर्षीही ही मोहीम राबवण्यात आली आहे .गेल्या वर्षी अडीचशे झाडे मुरगूड शहर आणि परिसरामध्ये लावण्यात आली होती यंदाच्या वर्षी ५०० . झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती शिवभक्तांतर्फे देण्यात आली .शहर परिसरात ठीक ठिकाणी अशी झाडे लावण्यात येणार आहेत शेतकरी, विद्यार्थी, शहरातील नागरिक यांनाही तसे आवाहन करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisements

“झाडे लाऊ,झाडे जगवू ” हे घोषवाक्य प्रत्यक्षात साकारण्याचे या युवकांनी ठरविले आहे.मुरगूड नगरपरिषदेने या कामी सर्व सहकार्य देण्याचे ठरविले आहे.

Advertisements

यावेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव भाट, विक्रम गोधडे, ओंकार पोतदार, सुशांत मांगोरे, पांडुरंग मगदूम, तानाजी भराडे, संकेत भोसले, विनायक साळोखे, जगदीश गुरव, उमेश कुलकर्णी, शशिकांत पाटील, पोलिस कर्मचारी विलास पाटील, राहुल केणे, युवराज पाटील, भैरवनाथ पाटील यांच्यासह पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!