मुरगूड येथे ठिकठिकाणी सुवासिनींनी केली वटसावित्रीची पूजा

मुरगूड ( शशी दरेकर ) : ज्येष्ठ मासातील पौर्णिमा.हा दिवस वट पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.या दिवशी सुवासिनी वटवृक्षाची मनोभावे पूजा  करून पतीला आरोग्य दायक दीर्घायुष लाभावे अशी प्रार्थना करतात.

Advertisements

पौराणिक संदर्भानुसार सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण पुन्हा मिळावेत म्हणून यमदेवाकडे मागणी केली होती.त्यासाठी वडाच्या झाडाखाली बसून साधना केली होती.प्रसन्न होऊन यम देवांनी सत्यवानाचे प्राण परत केले होते.तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा.या दिवशी वट सावित्रीची पूजा केली जाते.

Advertisements

वडाच्या झाडात त्रिदेवांचा वास असल्याचे मानले जाते. मुळामध्ये ब्रह्मदेव बुंध्यामध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये शिव वास करतात असे मानले  जाते. सावित्रीला याच झाडाखाली पतीचे प्राण प्राप्त झाले म्हणून तिला सती सावित्री असे म्हणतात. सतीचा वास सुद्धा वडाच्या झाडात असतो असे मानले जाते.

Advertisements

पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा वडाच्या झाडाचे अनन्य साधारण महत्व आहे.हे झाड वातावरणात भरपूर ऑक्सिजन सोडते. सुखद सावली देणारे प्रशस्त झाड म्हणजे वटवृक्ष होय.

मुरगूड येथे गैबी पीर देवस्थान ,पाटील नगर, ज्ञानेश्वर कॉलनी, अंबाबाई मंदिर परिसर, महालक्ष्मी नगर ,कापशी रोड अशा विविध ठिकाणी वटसावित्रीची पूजा करण्यात आली. ज्ञानेश्वर कॉलनी येथे खास वट पूजेसाठी कुंडीत वाढवलेल्या झाडाची सुवासिनींनी मनोभावे पूजा केली.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!