कागल तालुका बाजार समितीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही: मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कागल येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार नाही, असा कोणताही निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. त्यामुळे या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Advertisements

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आता कागल येथे आपला उपबाजार (sub-market) सुरू करणार आहे. यासाठी बाजार समितीकडे स्वतःची जागा अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. मात्र, विविध कारणांमुळे हे काम प्रलंबित होते. आता कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने हे काम मार्गी लावण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Advertisements

यावर शेतकऱ्यांकडून असा प्रश्न विचारला जात आहे की, स्वतःची जागा उपलब्ध असूनही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे उपबाजाराचे काम कृषी उत्पन्न बाजार समिती आता तरी पूर्णत्वास नेणार का? कागल आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा उपबाजार अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, त्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी लांब जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!