गोकुळ शिरगावच्या विकासाला ‘ब्रेक’ का ? शाहू महाराज नगर २० वर्षांपासून उपेक्षित!

२० वर्षांची प्रतीक्षा ! गोकुळ शिरगावच्या शाहू महाराज नगरचे दुःख कोण ऐकणार?

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव हे एक प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाते. परंतु याच गावातील पूर्वेकडील छत्रपती शाहू महाराज नगर गेली २० वर्षे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विकासापासून दूर का राहिले आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. येथील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते गेल्या दोन दशकांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत.

Advertisements

गटारी, पथदिवे आणि पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचीही येथे वानवा आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यांना दिलासा कधी मिळणार, हाच खरा प्रश्न आहे.

Advertisements

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाणारे गोकुळ शिरगाव राष्ट्रीय महामार्गामुळे पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत विभागले गेले आहे. यातील पूर्वेकडील छत्रपती शाहू महाराज नगर मात्र गेल्या दोन दशकांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.

Advertisements

येथील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते गेली २० वर्षे अपूर्ण अवस्थेत आहेत, तर गटारी, पथदिवे आणि पाणीपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचीही वानवा आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी तयार झालेल्या रस्त्यांवर गटारीचे पाणी येत असल्याने त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. यामुळे रस्त्यांची चाळण झाली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार निवेदने आणि तक्रारी देऊनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे छत्रपती शाहू महाराज नगरमधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मूलभूत सुविधांसाठी गेली २० वर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याने, येथील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर ग्रामपंचायत कधी लक्ष देणार आणि नागरिकांना कधी दिलासा मिळणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!