बँकेच्या नवकल्पनांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

मुरगूड (शशी दरेकर) : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीचा एक भक्कम आधारस्तंभ असलेल्या विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेला यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. आर्थिक सक्षमीकरणाची गरज ७८ वर्षांपूर्वी ओळखून स्वर्गीय विश्वनाथराव पाटील यांनी या बँकेची स्थापना केली होती.

Advertisements

सहकार तत्वावर उभी राहिलेली ही संस्था आज ग्रामीण भागातील शेतकरी, उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी विश्वासाचे प्रतीक ठरली आहे. बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुरगूड येथे पार पडलेल्या  कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

Advertisements

             कागल तालुक्यातील मुरगूड येथील विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या 75 वा अमृत महोत्सवी सोहळा उप मुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या.

Advertisements

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे या योजनेमुळे खऱ्या अर्थाने महिलांचा विकास झाला आहे.अजित पवार यांनी बँकेच्या वाटचालीचे कौतुक केले.

“बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे आणि सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे ही संस्था आज प्रगतीपथावर आहे. चेअरमन प्रवीणसिंह पाटील आणि संचालक मंडळाने केलेल्या नेतृत्वामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि व्यावसायिकांचे जीवनमान उंचावले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “सहकार क्षेत्र ही महाराष्ट्राची ताकद आहे. या बँकेसारख्या संस्था जर नाविन्यपूर्ण योजना राबवत राहिल्या, तर निश्चितच ग्रामीण भागातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना नवी दिशा मिळू शकते

मुरगूड सहकारी बँकेचा हा अमृत महोत्सव म्हणजे सहकाराची मूल्ये आणि ग्रामीण विकासाचे प्रतिबिंब आहे. अशा संस्थांमुळे ग्रामीण भागात आत्मनिर्भरतेचे नवे क्षितिज उलगडत आहे. उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन आणि बँकेचे नेतृत्व पाहता, ही संस्था भविष्यातील अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देईल, याबद्दल शंका नाही.

स्वर्गीय विश्वनाथराव पाटील यांचा बिद्री सहकारी साखर कारखाना उभारणीत मोलाचे योगदान आहे दूरदृष्टी ठेवून त्यांनी साखर कारखान्याची स्थापना केल्याने आज चार तालुक्यातील  शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर मिळत आहे आणि यामुळेच या परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन यांनी सांगितले. 

संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला येत्या काळात शेतकरी हिताच्या नवकल्पनांवर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. “ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि युवा उद्योजकांसाठी नवीन आर्थिक योजना राबवण्यात येतील  असे बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील त्यांनी सांगितले

महिला आघाडीच्या अध्यक्षा शितल फराकटे म्हणाल्या मुरगूड हे कागल तालुक्याचा  केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते  मुरगूडची नगरपालिका ही पाटील घराण्यालाच शोभून दिसते नगरपालिकेची सत्ता ही प्रवीण दादांच्याकडे आसावी आसे सर्वसामान्य जनतेचे मत आहे आसे त्यानीं व्यक्त केले

कार्यक्रमास बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील माजी आमदार के पी पाटील,गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, भैय्या माने, मनोज फराकटे, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील, आमरसिह माने ,बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे ,सुधीर सावर्डेकर, दिग्विजय पाटील, सुहासिनी देवी पाटील, संजय मोरबाळे, जगन्नाथ पुजारी ,नामदेव भांदीगरे  ,राहुल वडकर ,राजू चव्हाण बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वास चौगुले ,विजय शेट्टी, जहांगीर नायकवडी ,राजू सातवेकर ,अमोल मंडलिक , सुहास घाटगे ,मारुती घाटगे ,बाजीराव रजपुत ,बाजीराव शिंदे आदी उपस्थित होते .

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!