गोकुळ शिरगावजवळ गाय वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात; चालक जखमी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील साई प्रसाद हॉटेलजवळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गायींची वाहतूक करणाऱ्या एका आयशर टेम्पोला अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झाला असून, वाहनातील काही गायींनाही दुखापत झाली आहे.

Advertisements

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०९ बीसी ०४०३ क्रमांकाचा टेम्पो चालक अभिजित आप्पासो पाटील (वय ३२, रा. आप्याचीवाडी रोड, म्हाकवे, ता. कागल) हा विनापरवाना गायींची वाहतूक करत होता.

Advertisements

टेम्पो भरधाव वेगात चालवत असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने साई प्रसाद हॉटेलजवळ डिव्हायडरला धडकून अपघात घडला. या धडकेत टेम्पोचेही नुकसान झाले आहे.

Advertisements

या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिवाजी कुंभार यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पोवार आणि सहाय्यक फौजदार शेख करत आहेत.

AD1

Leave a Comment

 
error: Content is protected !!