लोकशाहीत संघटनेला महत्त्व; गजाननराव गंगापुरे

मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाची 15 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; ज्येष्ठांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : जेष्ठांचा , नागरिकांचा उर्वरित काळ आनंदाचा व तणावमुक्त जावा ,त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यात संघ सतत कार्यरत असून त्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे यांनी दिली.

Advertisements

मुरगूडच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिक सभासदांच्या हस्ते दीपप्रज्वलन व त्यांचा सत्कार , एप्रिल व मे महिन्यात वाढदिवस असणाऱ्या १३ सभासदांना शुभेच्छा तसेच महिला सदस्यांचा सत्कार सभेत करण्यात आला.

Advertisements

अध्यक्ष गंगापूरे म्हणाले , ” लोकशाहीत संघटनेला महत्त्व असते संघटनेच्या बळावर लोकांचे प्रश्न सुटतात, म्हणून पंधरा वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. पंधरा वर्षात संघाचे काम दर्जेदारपणे सुरू आहे. ज्येष्ठांच्या विविध स्पर्धा , आरोग्य शिबिरे, मनोरंजनाचे कार्यक्रम ,सहली या माध्यमातून जेष्ठांना आनंदी व तणावमुक्त ठेवण्यासाठी विविध उप्रकम सुरू आहेत. त्यासाठी समाजातील विविध घटक मदतीचा हात देत आहेत.”

Advertisements

स्वागत संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर यांनी केले. प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष पीडी मगदूम यांनी केले. अहवाल वाचन अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यांनी केले. अविनाश चौगले यांनी निवेदन केले. संघाचे खजिनदार शिवाजीराव सातवेकर यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!