नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्य नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धैचे उद्घाटन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने व मुरगूड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रतिमापूजन – तहसीलदार अमरदीप वाकडे, ध्वजारोहण – प्रांताधिकारी प्रसाद चौगले दीपप्रज्वलन – केडीसीसी संचालक भैय्या माने, गोकूळ संचालक किसन चौगले , बिद्री साखर संचालक पंडीत केणे, बिद्री साखर उपाध्यक्ष मनोज फराकटे ,मॅटपूजन – गोकूळ संचालक नविद मुश्रीफ, गोकूळ संचालक अंबरिश घाटगे यांच्या हस्ते पार पडले.

Advertisements

यावेळी नविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे , भैय्या माने , दिग्वीजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेत राज्यातून ४५० मल्ल सहभागी झाले आहेत.

Advertisements

यावेळी सुर्याजी घोरपडे , रवींद्र पाटील , दिग्वीजय पाटील , दत्ता पाटील केनवडेकर ,विकास पाटील , देवानंद पाटील , फतेसिंह भोसले ,प्रवीण काळबर , प्रा. चंद्रकांत जाधव , सरपंच दिपक आंगज उपस्थित होते .

Advertisements

स्पर्धेत पंच म्हणून संदीप पाटील, बाबा शिरगावकर , आनंदा गोडसे , आकाश नलवडे , वैभव तेली , महेश पाटील , पांडूरंग पुजारी यांनी काम पाहिले.

स्वागत माजी नगरसेवक दिगंबर परीट यांनी प्रास्ताविक मुरगूड शहर राष्ट्रवादी अध्यक्ष रणजीत सुर्यवंशी, सुत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. तर आभार डॉ सुनिल चौगले यांनी मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!