शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नंदिनी साळोखेचा यथोचित सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू  नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Advertisements

मुरगूडच्या सरपिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक हरिशश्चंद्र साळोखे यानी नंदिनीच्या निवासस्थानी जाऊन तिचा यथोचित सत्कार केला. या सत्कारप्रसंगी ते म्हणाले वयाच्या ३२ व्या वर्षी नंदिनीने हा मानाचा पुरस्कार मिळवून यश संपादन केले आहे. तिच्या आईनेही प्रतिकूल परस्थितीत तिला साथ दिली आहे.

Advertisements

या दैदित्यमान यशामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासाहेब लवटे, माजी खासदार संजयदादा मंडलिक, आखाडयाचे अध्यक्ष , वस्ताद सुखदेव येरूडकर, अॅड विरेंद्र मंडलिक, आणि वेळोवेळी तिला प्रोत्साहन देणारे मार्गदर्शक यांचे या यशामध्ये मोठे योगदान आहे. यावेळी नंदिनीचे त्यानीं तोंडभरून कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

या सत्कार प्रसंगी कोल्हापूर जिल्हा बेकर्स ग्राहक संस्थेचे संचालक महादेवराव साळोखे, शोभा साळोखे, वैशाली साळोखे, सतीश साळोखे, आदित्य साळोखे, ताई नामदेवराव साळोखे, शुभांगी सतिश साळोखे यांच्यासह मुरगूड मधील नागरीक उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!