
बोळावी येथे ११ कोटी ६० लाखांच्या विकास कामांचा लोकार्पण
बोळावी, दि. २१: मतदार संघात रस्ते,शाळा, आरोग्य यांचे प्रश्न मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य आहेच. हे कर्तव्य बजावत त्यापुढे जावून गरिबांना सुखाचे दिवस यावेत यासाठी मिळालेली सत्ता गरिबांच्या मागे उभी करण्याचे सामर्थ्य हे मंञी हसन मुश्रीफ यांच्यामध्येच आहे. म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला आहे, असे प्रतिपादन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले. यावेळी ना.हसन मुश्रीफ म्हणाले, संजयबाबा यांना आता कोणतीही सत्ता व प्रतिष्ठा मिळावी याबाबत इच्छा नाही. तर ३० वर्षे सत्ता नसतानाही पडत्या काळात पाठिशी उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना सुखाचे दिवस यावेत, यासाठीच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बोळावी ता.कागल येथे कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल बोळावी ग्रामस्थांच्यावतीने नामदार हसनसो मुश्रीफसाहेब यांचा जाहीर नागरी सत्कार व विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
पांढऱ्या पट्टयात नंदनवन फुलवू : मुश्रीफ
बोळावी, बोळावीवाडी, ठाणेवाडी या दुर्गम डोंगराळ भागात बारमाही पाण्याअभावी शेती पिकत नाही. त्यामुळे येथे शाश्वत पाण्याची सोय करा, अशी मागणी ग्रामस्थांसह माजी आमदार श्री. घाटगे यांनी केली. तर येत्या वर्षभरात या पांढऱ्या पट्टयात नंदनवन फुललेले पाहायचे आहे. यासाठी माझे शासनपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे अभिवचन, मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.
सोलर योजनेला चालना देवू : ना.मुश्रीफ
ज्या धरणातील पाणी शिल्लक राहते ते पाणी अवर्षणप्रवण भागात आणण्यासाठी प्रयत्न करु. यासाठी सोलर योजनेचा आधार घेवू. तसेच, शासनाला व जाणार खजिना सापडला आहे. याचा उपयोग करून शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्यासाठी अनेक गावातील गायरानातील जमीनीवर सोलर प्रकल्प उभारुन वीज उपलब्धता केली जात असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सूर्याजी घोरपडे, ज्योती मुसळे, दिग्विजयसिंह पाटील, सरपंच सागर माने, उपसरपंच आनंदा पाटील, रामदास पसारे, दयानंद कणसे, अर्चना पाटील, शोभा कावळे, आनंदा साळुंखे, दीपक पाटील, विनायक तोरसे, सुभाष गडकरी, पुंडलिक वास्कर, बाबुराव भोसले, पुरुषोत्तम साळुंखे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
बोळावी ता. कागल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे यांचा एकाच हारात असा संयुक्त सत्कार करण्यात आला.