व्यावसायिक लोक बाद असतात असे उच्चारताच दोन व्यवसायिकात हाणामारी

कागल(विक्रांत कोरे) : ॑व्यावसायिक लोक बाद असतात ‘असे उच्चारताच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या दोन व्यवसायिकात हाणामारी झाली, यात एका व्यवसायिकाच्या तोंडावर स्टीलचा ग्लास मारल्याने जखमी झाला .हा प्रकार उजळाईवाडी तालुका करवीर येथील हॉटेल नक्षत्र मध्ये रात्री घडला.

Advertisements

अभिजीत भोसले राहणार कोल्हापूर असे आरोपीचे नाव आहे. तर उमेश पवार असे जखमीचे नाव आहे .गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात सदर घटनेची नोंद झाली आहे. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, उमेश संभाजी पवार राहणार कोल्हापूर व अभिजीत भोसले राहणार कोल्हापूर हे कामाच्या निमित्ताने एकत्र आले.

Advertisements

त्‍यांनी जेवणाचा बेत करून ते उजळाईवाडीतील हॉटेल नक्षत्र मध्ये जेवण्यासाठी गेले. बोलता-बोलता आरोपी अभिजीत भोसले याने “व्यावसायिक लोक बाद असतात” असे वारंवार उच्चारल्याने उमेश पवार यानी त्यास शाब्दिक विरोध केला.

Advertisements

त्यामुळे आरोपीने टेबलावरील ग्लास घेवुन जोराने नाकावर मारला. तो जखमी झाला, जखमीवर उपचार करण्यात आले. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील हवलदार एसएम खोत हे पुढील तपास करीत आहेत.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!