वाघापूरात जळ यात्रेचे तयारी पूर्ण

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र तसेच कर्नाटक मधील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव देवाची त्रैवार्षिक जळ यात्रेची तयारी पूर्ण झाली असून स्थानिक देवस्थान समिती व ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून परिश्रम घेतले जात असून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

Advertisements

यावेळी आज शनिवार दिनांक 22 रोजी सुहासिनी पूजन सायंकाळी विठ्ठल बिरदेव पालखीचे प्रस्थान रविवार दिनांक 23 रोजी ढोल वादन वालंग व कर पूजन सोहळा सोमवार दिनांक 24 रोजी यात्रा सायंकाळी भाकणूक पालखी प्रदक्षिणा मंगळवार दिनांक 25 रोजी सायंकाळी भाकणूक पालखी प्रदक्षिणा तसेच बुधवार दिनांक 26 रोजी ग्रामदैवत ज्योतिर्लिंग व भैरवनाथ देवालय बांधकाम सुरू असल्याने पूरण पोळीचा गोड नैवेद अर्पण केला जाणार असल्याचे स्थानिक देवस्थान समितीचे अध्यक्ष व सरपंच बापूसाहेब आरडे यांनी सांगितले. यावेळी पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे तसेच स्थानिक देवस्थान समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!