
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, कणेरी येथे न्युरोसर्जरी विभागात अत्यंत जटील, जोखमीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक न्युरो मायक्रोस्कोप भारतात प्रथमच दाखल झाला आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या पावन पर्वदिनी परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या पावन सानिध्यात या मायक्रोस्कोपचे लोकार्पण झाले. न्युरो मायक्रोस्कोपची वैशिष्ट्ये अत्याधुनिक प्रणाली ZEISS PENTERO 800 S हे उपकरण भारतातील पहिले असून, यामुळे कमी वेळात आणि सहजपणे मेंदूवरील शस्त्रक्रिया करणे सोपे होणार आहे.

या मशीनमध्ये 4K-3D कॅमेरा सिस्टीम असल्याने अतिशय सुस्पष्ट दृष्टी आणि त्रिमितीय प्रतिमा दिसणार आहे. या मायक्रोस्कोपचा उपयोग मेंदू आणि मणक्याच्या अतिशय गुंतागुंतीच्या आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया सहजपणे करणे शक्य होणार आहे. अंदाजे साडेतीन कोटी रुपये सिद्धगिरी हॉस्पिटलमधील मशीन आहे.
न्यूरो नेव्हिगेशन सिस्टम, न्यूरो NIM-3, न्यूरो मॉनिटरिंग सिस्टम CUSA DRIL आणि अत्याधुनिक न्यूरो ऍनास्थेशिया मशीन. पूर्णवेळ न्यूरो भूलतज्ञ, न्यूरो पॅथॉलॉजिस्ट, CT, MRI स्वतंत्र न्यूरो आयसीयू, ना नफा ना तोटा या तत्त्वावरती वाजवी दरात रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध.
या कार्यक्रमात उपस्थित आमदार. महेश शिंदे (कोरेगाव), डॉ. सुप्रिया देशमुख (जिल्हा शल्य चिकित्सक), गोकुळ दुध संघ संचालक नंदकुमार ढेगे, विवेक राव पाटील, जालंदर पाटील, शरद सावंत, राजन पाठारे, संतोष पाटील, बाळकृष्ण विचारे, डॉ. वर्षा पाटील, डॉ.प्रकाश भरमगौडर, डॉ. तनिष पाटील, उपस्थित होते.