कागल(एस. सणगर) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पा अंतर्गत कसबा सांगाव बीटच्यावतीने करनूर तालुका कागल येथे आरंभ -पालक मेळावा व कृती प्रदर्शन नुकतेच पार पडले. करनूर विद्यामंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात खेळ -संवाद व कृतीच्या माध्यमातून विविध अनुभवांच्या ज्ञानात भर पडणारे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले होते.
करनूर येथील अंगणवाडी अंतर्गत आयोजित कृती प्रदर्शनामध्ये भविष्याचे झाड, मेंदूची वाढ विरुद्ध शारीरिक वाढ, गरोदरपणातील आहार ,0 ते 3 वर्षे वयोगटातील खेळ, आहाराबद्दल मार्गदर्शन, सापशिडी ,मेंदूचे जाळे ,मायेचा घास अशा विविध स्टॉलच्या मांडणीतून सर्वांनाच आकर्षित केले जात होते.

कागल पंचायत समितीच्या बाल प्रकल्प विकास अधिकारी सौ जयश्री नाईक मॅडम म्हणाल्या,बालकांचा बौद्धिक ,भावनिक व शारीरिक विकास होण्यासाठी असे उपक्रम पालकांनी घरी राबवावेत .जेणेकरून याचा लाभ बालक- पालक या दोघांनाही होईल. कागलच्या गटशिक्षणाधिकारी सारीका कासोटे मॅडम म्हणाल्या, आज पालक आपल्या पाल्यांना बाहेरच्या भुलभुलय्या शाळेत भरमसाठ फी भरून पाठवतात. परंतु त्यांनाआपल्या जिल्हा परिषद शाळेत पाठवून देऊन चांगले ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केले.
सरपंच सौ संगीता जगदाळे, माजी उपसरपंच प्रवीण कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष वैभव आडके, मनीषा तोडकर ,वर्षा शिंदे माजी सरपंच रेश्मा शेख, अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना चव्हाण, सुजाता चौगुले, हिना शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उपसरपंच रोहन पाटील, तातोबा चव्हाण, तानाजी भोसले ,अश्विनी चौगुले ,कविता घाटगे ,ग्रामसेवक सात्ताप्पा कांबळे, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष विक्रांत कोरे,बाळासो पाटील, राज महंमद शेख, अण्णासो पाटील, मुख्याध्यापक अनिल पाटील, अंगणवाडीच्या सेविका कांचन कुलकर्णी, आरती शिंदे, राजश्री पाटील, सुनिता पाटील ,रेश्मा शेख, प्रिया शिंदे, मदतनीस मालूताई कोरे ,मिनाज आलासे रूपाली घोरपडे, अलका नलवडे, ललिता चौगुले, आदींसह माता, पालक, बालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.