मुरगूड ( शशी दरेकर ) : महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ता कक्ष विभाग( IQAC), वाणिज्य विभाग व अर्थशास्त्र विभाग आणि एन आय एस एम(NISM) नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेक्युरिटी मार्केट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये सेबीमार्फत मोफत प्रशिक्षण जैनॉलॉजी विभाग, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरचे प्रा. डॉ. व्ही बी ककडे यांनी गुंतवणुकीबद्दल विविध प्रकारचे मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामध्ये त्यांनी गुंतवणुकीचे महत्त्व, गुंतवणुकी मधील संधी, सेक्युरिटीज मधील गुंतवणुकीच्या पद्धती, संधी, स्टॉक मार्केट, गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी, सेक्युरिटी मार्केटमधल्या संधी, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, एस आय पी अशा अनेकविध प्रकारची गुंतवणुकीबद्दलच्या माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाअंतर्गत स्वतःचा व्यवसाय अथवा नोकरी करण्याच्या संधी कशा प्राप्त करून घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणा च्या दरम्यान अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एस एम होडगे यांनी विद्यार्थ्यांनी सेबीमार्फत उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा लाभ घ्यावा व स्वतःच्या पायावर सन्मानाने उभे राहावे असे आवाहन केले. प्रशिक्षणाच्या प्रारंभी स्वागत व प्रस्तावित महाविद्यालयाच्या NAAC समन्वयक व प्रशिक्षणाच्या समन्वयक प्रा. डॉ. सौ एम. एस. पाटील यांनी केले. परिचय प्रा. संजय हेरवाडे यांनी केला तर आभार प्रा. राहुल बोटे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. कुमारी तृप्ती गवाणकर, कुमारी आरती गिरीबुवा व कुमारी श्रेया कुंभार यांनी केले. या प्रशिक्षणासाठी विशेष परिश्रम प्रा.रामचंद्र पाटील, डॉ. गुरुनाथ सामंत यांनी घेतले. या प्रशिक्षणाचा लाभ जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांनी घेतला.
I simply could not go away your web site prior to suggesting that I really enjoyed the standard info a person supply on your guests Is going to be back incessantly to investigate crosscheck new posts