मुरगूड (शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथील सुवर्ण – महोत्सवी श्री .लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सावर्डे बु॥ शाखेकडील कर्जदार श्री रणजीत विष्णूपंत गायकवाड रा . गोरंबे यानां नवीन क्रांक्रीट मिक्सर मशिन या वाहन खरेदी हायर परचेस योजनेअंतर्गत ३३ लाख रुपये कर्ज वितरण संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री किशोर विष्णूपंत पोतदार यानी दिली .
सदर कार्यक्रमात क्रांक्रीट मिक्सर मशिन वाहनाचे पूजन चेअरमन , व्हा . चेअरमन व संचालक यांच्या शुभहस्ते करण्यात येऊन वाहनाची चावी गायकवाड यांच्याकडे प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन पोतदार यानीं संस्थेकडील व्यवहाराची माहिती दिली . चालू स्थितीची ३१ डिसेंबरअखेर संस्थेकडे १२० कोटी ठेवी व८४ कोटी कर्जे आहेत . तसेच मार्च २०२५पर्यंत १२५ कोटीच्या ठेवीचा टप्पा करणेचा संकल्प केलेला आहे.

मुरगूड येथिल श्री . लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह से . कापशी , सावर्डे बु॥, कूर , शेळेवाडी , सरवडे, येथे शाखा तप्तर सेवा देत कार्यरत आहेत .कर्जदारानां कर्जरुपाने कर्ज पुरवठा करुन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी या श्री .लक्ष्मीनारायण पतसंस्थेकडे अभिमानाने पाहिले जाते .
वाहन वितरण प्रसंगी विणूपंत गायकवाड , सागर पोवार , रघुनाथ जमदाडे , सावंत डॉक्टर , दत्तात्रच शिरगांवकर , संस्थेचे व्हा . चेअरमन श्री .दत्तात्रय कांबळे , जेष्ठ संचालक श्री .जवाहर शहा , श्री . पुंडलिक डाफळे ,संचालक सर्वश्री दत्तात्रय तांबट , अनंत फर्नांडिस , चंद्रकांत माळवदे , विनय पोतदार , रविंद्र खराडे ,रविंद्र महादेव सणगर , संचालिका सौ . सुजाता सुतार , सौ . सुनिता सुशांत शिंदे , श्रीमती भारती कामत , तज्ञ संचालक जगदीश देशपांडे , कार्यलक्षी संचालक श्री . नवनाथ डवरी , सचिव मारुती सणगर यांच्यासह कर्मचारीवर्ग उपस्थित होते .