कोल्हापूर खंडपीठासाठी माणिक पाटील चुयेकर यांचे दसरा चौकात उपोषण

कोल्हापूर (सलीम शेख) : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी माणिक पाटील चुयेकर यांनी दसरा चौकात उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.

Advertisements

चुयेकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते दसरा चौकात जमा झाले आहेत. उपस्थितांनी खंडपीठाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

Advertisements

या उपोषणादरम्यान बोलताना चुयेकर म्हणाले, “खंडपीठाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील नागरिकांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा.”

Advertisements

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)बबन शिंदे , विद्याधर शेटे, महेश शिंदे,महिपराव यादव, पांडुरंग फडतरे,सुरेश गटारे, विनोद चव्हाण, सतिश कोळी, श्रीकांत कांबळे, प्रकाश सुतार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बबन शिंदे यांनी शासनावर टीका करताना म्हणाले, “सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. कोल्हापूरच्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू.”

खंडपीठ कृती समितीने या उपोषणाला पाठिंबा दिला असून, जोपर्यंत सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!