
कोल्हापूर (सलीम शेख ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने एक अनोखा शिवजयंती सोहळा आयोजित केला होता. नेहमीच्या खर्चाला फाटा देत, हा सोहळा सावित्रीबाई फुले रुग्णालयात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात महिलांच्या हस्ते महाराजांना अभिवादन करण्यात आले, तसेच रुग्णालयातील गरजू रुग्णांना ब्लँकेट आणि लहान मुलांचे कपड्याचे किट वाटण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित महिलांचा फेटा बांधून व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे निवेदन रंजना पाटील (जिजाऊ ब्रिगेड प्रवक्त्या) यांनी केले, तर वसंतराव मुळीक (अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष) यांनी आपल्या भाषणात शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. अनिता टिपुगडे यांनी शिवरायांचे गीत गायले, तर रुग्णालयातील कर्मचारी सुनीता सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

या अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शैलेजा भोसले, उषा लाड, संयोगिता देसाई ,महादेव पाटील शशिकांत पाटील, तसेच प्रमुख उपस्थिती सुधाताई इंदुलकर (सरकार), आईशा फिरोज खान उस्ताद (छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष), फिरोज खान अब्दुल खान उस्ताद (पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड अध्यक्ष), रेखाताई आवळ ,मिरा मोरे,शीतल तिवडे, हेमलता पोळ,शहनाज शेख ,लता पोरे,लक्ष्मी मंडेकर,सोनाली कांबळे, रिहाना नागरगट्टी, सावित्रीबाई फुले रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी,कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.