मुरगूड ( शशी दरेकर ) – अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी अविनाश मारुती तसीलदार याची १२० किलो वजन गटात निवड झाली आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून त्याने यश संपादन केले . पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत शिवराज विद्यालयाला पहिलेच गोल्ड मेडल मिळवून ” शिवराज “च्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला .

त्याला ए एस पॉवरचे प्रशिक्षक सुशांत नलवडे, .प्रा. सुशील अकोळकर क्रीडा शिक्षक एकनाथ आरडे यांचे मार्गदर्शन
तसेच संस्थेचे सेक्रेटरी खासदार संजयदादा मंडलिक , अध्यक्ष गजानन गंगापुरे, कार्याध्यक्ष वीरेंद्र भैया मंडलिक, कार्यवाह अण्णासो थोरवत, प्राचार्य जी.के. भोसले,प्रा. एस. एन. अंगज, उपप्राचार्य एल. व्ही. शर्मा यांचे प्रोत्साहन मिळाले .
या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे .