कागल : गाई व बैल कत्तलखान्याकडे नेणाऱ्या दोन वाहनांवर कागल पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई कागल महामार्गा लगतच्या सर्विस रोडवर, जयसिंग पार्क समोर रात्री उशिरा करण्यात आली. गोरक्षण सेवा समिती निपाणी व कागल यांच्यामुळे झालेल्या कारवाईने पशुपालकातून समाधान व्यक्त केले जात आहे.
गो रक्षण सेवा समिती निपाणी व कागल यांनी कागल तालुक्यात रात्री व पहाटे अशा वेगवेगळ्या ठिकाणी चार गाई व सहा बैल कत्तलीसाठी नेत असताना पोलिसांच्या सहकार्याने पकडले. त्या दोन वाहनांना गाय व बैलांस कागल पोलीस ठाण्यात दाखल केले

गो रक्षण सेवा समितीच्या कार्यकर्त्यांना गोपनीय माहिती मिळाल्याने कागल निपाणी महामार्गावर चार गाई घेऊन जाणारा टेम्पो तसेच पहाटे टोल नाका चुकून कागल मुरगुडच्या दिशेने जाणारा बैलांचा टेम्पो ट्रॅक्स शेंडूर फाटा नजीक पकडला. यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्यात आल्याचे निपणीचे गो रक्षक सागर श्रीखंडे यांनी सांगितले. एम् 45 एक एफ् -865व एम् एच् 09-ई एम्-3053 या दोन वाहनांसह सुमारे 3लाख18 हजार किंमतीचा मुद्देमाल कागल पोलीसांकडून जप्त करण्यात आला आहे
कागल पोलीस ठाण्याच्या आवारात बांधण्यात आलेल्या गाई व बैलांच्या चाऱ्याची व्यवस्था कागल जयसिंगराव पार्क येथील विवेक कुलकर्णी व विनय कुलकर्णी यांनी केली आहे. या कारवाईमध्ये ओंकार त्रिगुणे,समर्जित जाधव, अथर्व करंजे, प्रेम त्रिगुने,सोहम किंकर,विशाल मर्दाने,नितीन परीट,सागर कोळेकर,लगमान कोळेकर,अभिषेक करंजे,केतन कदम,प्रणव माळी,पार्थ जाधव,प्रणव भिवसे,अविरज बागल सह कसबा सांगाव, यळगुड, हुपरी, कागल येथील गोरक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.