मुरगूड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील मॅटवरील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यामध्ये मावळा सडोली या संघाने प्रतिस्पर्धी शिवमुद्रा कौलव संघावर २ गुण मिळवून विजय मिळविला.व स्पर्धेतील मावळा सडोली हा संघ विजेता ठरला.तर शिवमुद्रा कौलव या संघाने उपविजेतेपद मिळविले. तर तृतीय क्रमांक जय शिवराय हेरले संघाने मिळवला.स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक जय हनुमान बाचणी या संघाने मिळवला.
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने व विश्वनाथराव पाटील कला,क्रिडा व सांस्कृतिक व्यायाम मंडळ प्रणित लाल आखाडा संकुल यांच्या वतीने शेतकरी संघाचे चेअरमन प्रविणसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रविणसिंह पाटील यांचा नागरी सत्कार के.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार के.पी.पाटील यांच्या हस्ते माजी शेतकरी संघाचे चेअरमन प्रविणसिंह पाटील, गोकूळचे संचालक नंदकुमार ढेंगे,बिद्रीचे संचालक रंगराव पाटील,धनाजीराव देसाई,उमेश भोईटे,रणजित मुडूकशिवाले,रावसो खिल्लारी,उत्तम कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडले.
उपांत्य फेरीतील पहिला सामना मावळा सडोली आणि हेरले यांच्यात झाला. यामध्ये मावळा संघाने ६ गुणांनी विजय मिळवला.तर दुसरा सामना शिवमुद्रा कौलव आणि बाचणी यांच्यात झाला. यामध्ये शिवमुद्रा कौलव संघाने १४ गुणांनी विजय मिळवला.त्यानंतर अंतिम लढत शिवमुद्रा कौलव आणि मावळा सडोली यांच्यात झाला.अंतिम सामन्यात मावळा सडोली संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.
मध्यंतरापर्यंत मावळा संघाने ८ गुणांची आघाडी घेतली होती.त्यानंतर कौलव संघाने आक्रमक खेळी केली.मात्र मावळा संघाने जोरदार खेळ करुन २ गुणांनी विजय मिळवला.
स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील २५ पेक्षा संघांनी आपला सहभाग नोंदवला होता.
प्रथम क्रमांकांसाठी ३१ हजार ६४ रुपये,तर २१ हजार ६४ रुपये,११ हजार ६४ रुपये,आणि ७ हजार ६४ रुपये,व चषक अशी बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेमध्ये मावळा सडोली संघाचा
अष्टपैलू खेळाडू म्हणून सौरभ खोत याला १ हजार १ रुपये,तर युवा स्पोर्ट्स आणाजे संघाचा खेळाडू भूषण पाटील याला उत्कृष्ट रायडर म्हणून गौरविण्यात आले तर पकडीसाठी सुधीर हुजरे या शिवमुद्रा संघाचा खेळाडू ७५१ रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
या प्रसंगी डी.डी.चौगले,अजिंक्य पाटील (शिरोळ),सत्यजित पाटील,सौ.रेखा सावर्डेकर,वेदिका गायकवाड,डॉ. सरेश खराडे,विजय खराडे,अमोल पाटील,वसंतराव शिंदे,विश्वास चौगले,गणपतराव लोकरे,अरुणकुमार व्हरांबळे,प्रताप पाटील,संदेश शेणवी,वसंत मांगोरे आदी उपस्थित होते.स्वागत अँड.सुधीर सावर्डेकर यांनी,प्रास्ताविक दिग्विजय पाटील यांनी केले.
पंच – स्पर्धेसाठी रुपेश जाधव,प्रदीप बनगे, कमुद्दिन देसाई,शिवाजी बोलके,जीवन निकम,अजय सावंत,धनाजी गावडे,बशीर सय्यद,अवधूत परीट,संतोष डवरी,नाना सुतार,मनोज मगदूम,संभाजी गावडे, किशोर दंडवते,सनी साळुंखे,निकेश पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.