मुरगूडच्या मुलींना महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीत पाच सुवर्ण पदके

मुरगूड ( शशी दरेकर ) : देवळी ,जिल्हा वर्धा येथे झालेल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती (SAI)संकुल च्या मुलींनी पाच सुवर्ण,एक रौप्य व तीन कास्य पदकांची कमाई केली.

Advertisements

    सुवर्ण पदके याप्रमाणे १.नंदिनी बाजीराव साळोखे 50 किलो,२.स्वाती संजय शिंदे 53 किलो,३. तन्वी गुंडेश मगदूम 57 किलो,४. शिवानी बिरु मेटकर 68 किलो,५.वैष्णवी रामा कुशाप्पा 72 किलो. रौप्य पदके ६. गौरी अमोल पाटील 59 किलो.
कास्य पदके ७.नेहा किरण चौगुले 55 .८.स्नेहल .शिवाजी पालवे 59 किलो.९.अस्मिता शिवाजी पाटील.62 किलो.
अमृता शशीकांत पुजारी हिने ओपन (76 किलो) मध्ये उप महाराष्ट्र केसरी हा किताब मिळविला.

Advertisements

त्यानां एनआयएस आंतरराष्ट्रीय कोच दादासो लवटे , माजी नगराध्यक्ष , वस्ताद सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर , सागर देसाई यांचे मार्गदर्शन तर माजी खासदार संजयदादा मंडलिक, कार्याध्यक्ष विरेंद्र मंडलिक, साई राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण , कार्यवाह आण्णासो थोरवत , डॉ . प्रशांत अथणी ( निपाणी ) , जय शिवराय एज्यूकेशन सोसायटी व मुरगूड नगरपरिषद यांचे प्रोत्साहन लाभले .

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!