मुरगूडमध्ये विविध ठिकाणी ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथे २६ जाने२५ रोजी ७६वा भारतीय प्रजासत्ताक दिन विविध ठिकाणी उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. हुतात्मा स्मारक ध्वजारोहन सकाळी ७ .३०वा श्री अरुण ज्ञानदेव चौगले यांच्या शुभहस्ते, मुरगूड नगर परिषद समोरील सकाळी ७ .५०वा ध्वजारोहन श्री बाळू बापू शेळके , कै . सुलोचनादेवी बालवाडी ध्वजारोहन सकाळी ८ .२०वा श्री भिकाजी अनंत भांदिगरे तर हुतात्मा तुकाराम चौक येथिल ध्वजारोहन सकाळी ८ .३०वा मुख्याधिकारी श्री अतिश वाळूंज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Advertisements

त्याचबरोबर मुरगूड पोलिस स्टेशन प्रांगणातील ध्वजारोहन सपोनि श्री शिवाजीराव करे, राणा प्रताप चौक- जवाहर मो . शहा, व्यापारी नागरी सह .पतसंस्था -जेष्ठ संचालक साताप्पा बा . पाटील (यमगेकर ), अष्टविनायक पतसंस्था -डॉ . प्रभाकर विश्वास , हुतात्मा तुकाराम वाचनालय – मुरगूड पोलिस स्टेशनचे सपोनि शिवाजीराव करे , शिवराज विद्यालय येथिल प्राचार्य जी के भोसले, गणेश नागरी सह .पतसंस्थेचे झेंडावंदन -चेअरमन सोमनाथ यरनाळकर , लक्ष्मीनारायण नागरी सह .पतसंस्थेचे ध्वजारोहन संचालिका सौ . सुनिता सुशांत शिंदे यांच्या शुभहस्ते , शाहू दुध शॉपी येथे ध्वजारोहन श्री मधुकर अर्जुने , मुरगूड विद्यालय मुरगूड येथिल ध्वजारोहन एस पी पाटील यांच्या शुभहस्ते धजारोहन सपन्न झाले.

Advertisements

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रा . सुनिल डेळेकर ( पत्रकार दै . पुढारी), व प्रा . रविंद्र शिंदे (पत्रकार दै . तरूण भारत) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. एकंदरीत शहरात ठिकठिकाणी देशभक्तीपर गीतानीं व उत्साहाच्या वातावरणात ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!