कणेरीवाडीतील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची साडेतीन कोटीची फसवणूक !

गोकुळ शिरगांव: एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला साडेतीन कोटी रुपयांनी फसवून टाकण्याच्या गंभीर प्रकरणात गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी विरेंद्रकुमार कृष्णा पाटील आणि त्याची पत्नी प्रियंका यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisements

फिर्यादी संदीप मारुती कोथळे यांचे एस.के. ट्रान्सपोर्ट अँड फर्निचर हे व्यवसाय आहे. आरोपी विरेंद्रकुमार हा त्यांचा जीएसटी कर सल्लागार म्हणून काम करत होता. त्याने फिर्यादींच्या विश्वासाचा गैरफायदा उठवत त्यांच्या जीएसटी क्रमांकाचा गैरवापर केला.

Advertisements

आरोपीने फिर्यादींच्या व्यवसायाच्या नावावर बनावट सिमेंट खरेदी-विक्रीची बिले तयार करून जीएसटी पोर्टलवर अपलोड केली. यातून त्याने “ओम ट्रेडर्स” या फर्मला आर्थिक फायदा करून दिला आणि स्वतःच साडेतीन कोटी रुपये हडप केले.
आरोपी विरेंद्रकुमारवर पूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. 2019 मध्ये त्याने मंगल निर्मळे या महिला उद्योगाची फसवणूक केली होती.

Advertisements

या प्रकरणात गोकुळ शिरगाव पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला साडेतीन कोटी रुपयांनी फसवणूक केली. आरोपी विरेंद्रकुमार पाटील आणि त्याची पत्नी यांना अटक करण्यात आली. त्यांनी जीएसटी क्रमांकाचा गैरवापर, बनावट बिले तयार करून फसवणूक, आरोपीवर पूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!